You are currently viewing आमदार केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या अंतर्गत वादामुळे सावंतवाडी शहराला विकासकामांत फटका.;नगराध्यक्ष संजू परब

आमदार केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या अंतर्गत वादामुळे सावंतवाडी शहराला विकासकामांत फटका.;नगराध्यक्ष संजू परब

सावंतवाडी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि माजी पालकमंत्री आ.
दीपक केसरकर यांनी आपपसातले अंतर्गत वाद मिटवावेत.त्यांचा
वादाचा फटका सावंतवाडी शहराच्या विकासाला बसला असून
पालकमंत्र्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देत, हरीश्चद्रांची गोष्ट सांगून भरीव निधी देणार असल्याची मोठी आश्वासन दिली होती. मात्र प्रत्यक्षात
त्यांनी कोणताही निधी दिलेला नाही. आ. दीपक केसरकर आणि
पालकमंत्र्यांचे पटत नसल्यामुळे हा विषय झाला असावा, असा संशय
आपल्याला असून दोघांनी भांडण मिटवत शहराच्या विकासासाठी निधी
उपलब्ध करुन द्यावा अस मत नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले.

दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांनी आतापर्यंत रोजगाराच्या नुसत्या
घोषणाच केल्यात. ३०० जणांना नोकऱ्या देणार असल्याचं ते म्हणाले
होते, मात्र १२ जणांना सुध्दा त्यांनी रोजगार दिला नाही असा सणसणीत
टोला लगावला. दरम्यान, घरपट्टी वाढीला विरोध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीकडे पाठ करुन शिवसेना गटनेत्या अनारोजीन
लोबो व त्यांच्या सहकाऱ्यांनी काय साध्य केले ? कोरोनामुळे नागरिक
त्रासलेले असताना त्यांना या ठरावात सहभागी होवून त्यांना दिलासा देणे
गरजेचे होते. मात्र, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली,त्यामुळे शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत असा आरोप नगराध्यक्षांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा