You are currently viewing ई.पीक पाहणी नोंदणीला शासनाने मुदतवाढ देऊन ऑफ लाईन पर्याय निवडावा.;सामाजिक कार्यकर्ते राजू भोगटे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी..

ई.पीक पाहणी नोंदणीला शासनाने मुदतवाढ देऊन ऑफ लाईन पर्याय निवडावा.;सामाजिक कार्यकर्ते राजू भोगटे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी..

कुडाळ /-

सध्या शासनाच्या सुरू असलेल्या ई पीक पाहणी नोंद बाबत सामाजिक कार्यकर्ते श्री .राजू भोगटे यांनी कुडाळ तहसिलदार श्री.अमोल फाटक यांना निवेदन! देऊन लक्ष वेधले आहे.ई
पीक पाहणी नोंद बाबत प्रत्येक शेतकऱ्यांचे आपले शेत जमिनीत स्वतः जाऊन पीक पाहणी अॅप व्दारे आपल्या पिकाची नोंदणी दिनांक 30/09/2021 पर्यंत करावी.असे महाराष्ट्र राज्य शासनाने जाहिर केलेले आहे.व त्याबाबत माहिती दिली जात आहे. परंतु प्रत्येक शेतकऱ्याकडे ॲन्ड्रॉईट फोन नाही, एखादया जवळ असल्यास तर तेवढा रॅम उपलब्ध नाही आणि रॅम असला तर इंटरनेट नाही. त्यामुळे मुदतीमध्ये इ पीक नोंद करणे शक्य होत नाही आहे. त्यात अनेक अडचणी निर्माण होत असुन शेतकऱ्याला स्वतःचा गट क्रमांक कुठे आहे हेच माहित नसल्या कारणाने प्रत्यक्ष जागेवरील लोकेशन आवश्यक असल्याने शेतकऱ्याला खुप अडचणीला सामोरे जावे लागते आहे.तरी कृपया शासनाने सदर पीक पाहणीला मुदतवाढ देऊन ऑफ लाईन पर्याय निवडून शेतकरी वर्गाला शासनाने सहकार्य करावे असे निवेदनाच्या माध्यमातून सामजिक कार्यकर्ते राजू भोगटे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा