You are currently viewing स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत अभिप्राय नोंदवा सीईओ प्रजित नायर यांचे नागरिकांना आवाहन..

स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत अभिप्राय नोंदवा सीईओ प्रजित नायर यांचे नागरिकांना आवाहन..

सिंधुदुर्गनगरी /-

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत पेयजल व स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली  यांनी दिलेल्या सुचनेनुसार राज्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा 2 अंतर्गत सन 2021-22 करीता राज्यातील ग्रामिण भागात स्वच्छ सर्वेक्षण सुरु करण्यात आले  असुन या सर्वेक्षणात लोकसहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा तसेच एस एस जी. 21 ॲपच्या माध्यमातुन नागरिकांनी प्रतिसाद नोंदवावे  असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.       स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिणमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायतीचा सहभाग असुन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे उदा. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, बाजाराची ठिकाणे या ठिकाणची स्वच्छते संदर्भातील सध्यस्थितीची पडताळणी होणार असुन, या पडताळणीच्या माध्यमातुन जिल्ह्याला 300 पैकी गुण देण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये नागरीकाचा सहभाग नोंदविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर एस एस जी २१ हे ॲप सुरु करण्यात आले आहे.  या ॲपच्या माध्यमातुन गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता सुविधा यावरील प्रश्नाची उत्तरे ग्रामस्थांना द्यावयाची आहेत.  ग्रामस्थांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन नोंदविलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातु जिल्ह्याला 350 पैकी गुण मिळणार आहेत आपला जिल्हा स्वच्छतेच्या क्षेत्रात कायम अव्वल राहिला आहे. जिल्हावासियांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातुन आपले मत नोंदवुन जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 पुन्हा एकदा स्वच्छतेच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवावे असे आवाहन प्रजित नायर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..