You are currently viewing राज्यस्तरीय जीतक्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्यानी पटकावले सुवर्णपदक…

राज्यस्तरीय जीतक्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्यानी पटकावले सुवर्णपदक…

देवगड /-

पंढरपुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्या कु. दीक्षा चंद्रकांत पारकर, कु जान्हवी नागेश बाक्रे यांनी अप्रतिम कामगिरी करत दोघींनीही गोल्ड मेडल मिळवले तसेच पुढील महिन्यात जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या नॅशनल जीत क्वांदो स्पर्धेसाठी दोघांचीही निवड झाली आहे. वरेरी येथील प्रतिथयश आंबा बागायतदार सामाजिक कार्यकर्ते विनायक पारकर,तसेच रुपेश पारकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.तसेच त्यांचे सर्व स्तरातूनअभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा