You are currently viewing शिवप्रेमीच्यावतीने पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन सुरू.;रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन..!

शिवप्रेमीच्यावतीने पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन सुरू.;रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन..!

कुडाळ /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामधील रस्ते अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवास करताना लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठविण्यासाठी सिंधुदुर्ग शिवप्रेमीच्यावतीने कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावरील पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन करण्यात आले.

या अगोदर पिंगुळी काळेपाणी येथे रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सर्वश्री राज वारंग, प्रकाश बरगडे, प्रथमेश धुरी, सुशांत नाईक, दैवेश रेडकर, रमाकांत नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते.रस्त्यासाठी निधी मंजूर झाला याचे स्वागत, परंतु तो पर्यंत जनतेने खड्ड्यांमधून प्रवास करावा का ? सिंधुदुर्ग शिवप्रेमीचा सवाल..!

अभिप्राय द्या..