You are currently viewing वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला निरोप..

वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला निरोप..

वेंगुर्ला/-

वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री निरोप दिला.गणेशोत्सव असो किंवा दिवाळी प्रत्येक वेळी समाजाच्या संरक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या घरी सण साजरे करण्याचा अवधी फार कमी मिळतो. पोलिसांनाही आपल्या घरच्या उत्सवाप्रमाणे गणेशोत्सवात सहभागी होता यावे यासाठी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. घरोघरी पूजन करण्यात आलेल्या गणरायांना दीड, पाच, सात, अकरा दिवसांनी विसर्जन होई पर्यंत पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्तासाठी नेमणूक केलेली असते. त्यामुळे वेंगुर्ले पोलीस ठाण्यात पूजन केलेल्या गणरायाची भक्ती भावाने पूजा करून १७ दिवसांनी बाप्पाला निरोप देण्यात येतो. काल रविवारी सतरा दिवसांनी मिरवणुकीने गणरायाच्या मूर्तीचे वेंगुर्ले मांडवी किनाऱ्यावर विसर्जन करण्यात आले.अखेर भक्तिभावाने या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्वांनी “गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करत गणरायाला निरोप दिला.

अभिप्राय द्या..