भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा संपन्न..

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा संपन्न..

वेंगुर्ला /-

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला ची मासिक सभा महाराष्ट्र शासन कोव्हिड १९ च्या नियमांचे पालन करुन आज रविवारी सायंकाळी रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाच्या कार्यालयात संपन्न झाली.या सभेत मंडळाच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा करुन मंडळाच्या विकास कामांबाबत आढावा घेण्यात आला.संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीबाबत केलेल्या प्रयत्नांची चर्चा करुन योग्य असलेल्या जमिनीचा शोध घेऊन प्रयत्न करण्याचे ठरले.सभेस अध्यक्ष रमण वायंगणकर,उपाध्यक्ष चंद्रकांत गडेकर, सरचिटणीस विकास वैद्य,प्रा.डॉ.आनंद बांदेकर, जयराम वायंगणकर,दत्ताराम नार्वेकर, चिंतामणी धुरी,रमेश नार्वेकर, श्रीकृष्ण पेडणेकर, तृप्ती साळगावकर, सुरेश धुरी आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..