सावंतवाडी /-

वन्यप्राण्यापासून हल्ला होऊन एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास दहा लाख रुपये अर्थसहाय्य, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच प्राण्याने हल्ला करून गंभीर दुखापत झाल्यास तात्काळ 20 हजारांची आर्थिक मदत रुग्णांना औषधोपचारांसाठी दिली जाईल असा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. याबाबतची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी दिली.

वन्य प्राण्यापासून हल्ला होऊन एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास रुपये दहा लाख अर्थसहाय्य मृत व्यक्तीच्या वारसांना मिळते. त्यापैकी तीन लाख रुपये तातडीने मदत मिळते व सात लाख रुपये नॅशनलाईज बँकेत ठेवून त्याचे व्याज दिले जाईल. तसेच रुग्णाला 50 टक्के अपंगत्व आल्यास ते पाच लाख त्या व्यक्तीला शासनामार्फत अर्थसाहाय्य दिले जाईल. यासाठी जिल्हा रुग्णालयातून अपंगत्वाचा दाखला घेण्यात यावा तसेच वन्यप्राण्यांपासून गंभीर दुखापत झाल्यास शासनामार्फत रुग्णाला उपचारासाठी रुपये 20 हजार खर्च दिला जाईल. वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, डुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, कुत्रा अशा वन्यप्राण्यांनी हल्ला केलेल्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास किंवा गंभीर झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास शासनामार्फत आर्थिक मदत दिली जाईल.यासाठी जिल्हा वनविभाग कार्यालय तसेच तालुका तहसीलदार महसूल विभाग यांच्या कार्यालयातून आर्थिक मदत व्यक्तीच्या वारसांना अपंगत्व, गंभीर दुखापत झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य मिळते, अशी माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी आघाडी सरकारने नुकताच झालेल्या शासन निर्णयानुसार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page