You are currently viewing कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देणार.;पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय.;आम.नाईक यांची माहिती

कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देणार.;पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय.;आम.नाईक यांची माहिती

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुरज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक संपन्न झाली. कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले. मेरीटाईमने बोर्डाने वॉटरस्पोर्ट व्यावसायिकांना परवानग्या देऊन जिल्हाधिकारी यांनी त्यांना सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. यासंदर्भातला आदेश जिल्हाधिकारी लवकरात लवकर काढतील अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर,मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..