You are currently viewing वेंगुर्ले तुळस येथील मेगा फ्रीडम रन स्पर्धेत अजय तुळसकर व दिव्या दळवी प्रथम..

वेंगुर्ले तुळस येथील मेगा फ्रीडम रन स्पर्धेत अजय तुळसकर व दिव्या दळवी प्रथम..

वेंगुर्ला /-


पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती व ‘आझादि’का अमृत महोत्सव च्या औचित्याने नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग,वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि आकार फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या मेगा फ्रीडम मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या पुरुष गटातून अजय तुळसकर यांनी तर खुल्या महिला गटातून कु. दिव्या दळवी यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला.’आझादी’ का अमृत महोत्सव पूर्ण भारतवर्षात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जात आहे. युवाईला नवचेतना देण्यासाठी मेगा फ्रीडम मॅरेथॉन चे आयोजन तुळस येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन तुळस सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, उपाध्यक्ष प्रदीप परुळकर व नाना राऊळ,सचिव प्रा.सचिन परुळकर,आकार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रथमेश सावंत, शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक साठे व सहकारी शिक्षक, निवृत्त सैनिक सुहास केरकर, नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग तालुका प्रतिनिधी श्रीहर्षा टेंगशे,निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, मंगेश सावंत, सद्गुरू सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.सदर मेगा फ्रीडम मॅरेथॉन स्पर्धा खुल्या पुरुष व महिला अशा दोन गटात संपन्न झाली. स्पर्धेच्या सुरुवातीला सरपंच यांनी उपस्थितांना फिट इंडियाचा संदेश देत क्रीडाज्योत प्रज्वलित केली. यावेळी खुल्या पुरुष गटातून प्रथम- अजय कृष्णा तुळसकर, द्वितीय- अंकुश विलास म्हापसेकर, तृतीय- सिद्धेश जनार्दन हरमलकर, उत्तेजनार्थ प्रथम- मितेश एकनाथ परब तर उत्तेजनार्थ द्वितीय- दुर्वांकुरानंद बापू नाईक यांनी यश संपादन केले.तर खुल्या महिला गटात; प्रथम- दिव्या यशवंत दळवी, द्वितीय – अर्पिता आनंद सावंत, तृतीय- संजना सुनिल परब, उत्तेजनार्थ प्रथम- साक्षी गुरुनाथ सावंत, उत्तेजनार्थ द्वितीय- चैताली रमाकांत निवजेकर यांनी यश संपादन केले.सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. उपक्रमाच्या यशास्वीतेसाठी वेताळ प्रतिष्ठान व आकार फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण राऊळ, गुरुदास तिरोडकर, माधव तुळसकर, महेश राऊळ, गणेश सावंत, सदाशिव सावंत, समीर गावडे, नाना सावळ, ओंकार राऊळ, प्रविण राऊळ, रोहन राऊळ, भूमिका चौगले,अक्षता गावडे ,भगवान चव्हाण, प्रविण कांदळकर, समिर वालावलकर, समर्थ तुळसकर आदीनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.सचिन परुळकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा