You are currently viewing प्रकाश लब्दे यांना महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर!

प्रकाश लब्दे यांना महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर!

मसुरे /-

देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र व डोंबिवली येथील श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळाचे संचालक प्रकाश लब्दे याना,आर्ट बिटस् फौडेशन पुणे यांचे कडुन आर्ट बिटस् महाराष्ट्र कला सन्मान पुस्कार २०२१ जाहीर झाला आहे.
घरात कोणी कलाकार नसताना स्वतः बद्दल आत्मविश्वास आणि रंगदेवतेच्या कृपेने यश मिळाल्याचे लब्दे सांगतात. दशावतारी स्वतंत्र मंडळ निर्माण करून या कलेला पुढे नेण्याचा प्रयत्न नोकरी धंदा संभाळुन ते करतात. महाराष्ट्रा सह गोवा राज्य, तसेच झी मराठी, दूरदर्शन, कामगार कल्याण, सांस्कृतिक संचालनालय आयोजित दशावतार महोत्सव मध्ये उत्कृष्ट कलाकार पारीतोषक तसेच गोरगरीब पूरग्रस्त ,रक्त दान अशी समाजसेवा ते करतात. दशावतार कलेतुन लोकाना प्रबोधन, ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न प्रकाश लब्दे यांच्या श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड – मुणगे डोबिवली यांस कडून होत असल्याने आर्ट बिट्स महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री प्रकाश लब्दे यांस महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जाहीर झाल्या मुळे डोबिवली, मुणगे गावातून त्यांचे कौतुक होत आहे. हा पुरस्कार माझा एकट्याचा नसुन माझ्या सर्व सहकलाकार यांचा आहे असे लब्दे सांगतात. आर्ट बिट्स पुणे यांचे श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे ‘डोबिवली यांस कडून आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा