You are currently viewing जिल्हा परीषद आरोग्य सभापतींच्या पाठपुराव्याला यश.;प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी व तळकट ला मिळणार नवीन रुग्णवाहीका..

जिल्हा परीषद आरोग्य सभापतींच्या पाठपुराव्याला यश.;प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी व तळकट ला मिळणार नवीन रुग्णवाहीका..

दोडामार्ग /-

कोरोना काळात आरोग्य सेवेत अतिशय महत्वाच्या असणाऱ्या म्हणजे रुग्णवाहीका.दोडामार्ग तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथील रुग्णवाहीका या जुन्या असल्याने आरोग्यसेवेत बऱ्याच अडचणी येत होत्या.याचा विचार करत सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य व शिक्षण सभापती डॉ.अनिषा दळवी प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथे नवीन रुग्णवाहीका मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील होत्या.

दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ग्रामस्थांची सततची मागणी व सततचा पाठपुरावा यामुळे अखेर दोनही आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहीका मिळाल्या आहेत.त्यामुळे लवकरच या दोनही रुग्णवाहीका प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी व तळकट येथे दाखल होतील व आरोग्य सेवेत कार्यरत असताना दिसतील त्यामुळे तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेस बळकटी येईल असे शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिषा दळवी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अभिप्राय द्या..