सर्वसामान्यांना म्हाडाचा दिलासा.;घरांच्या सोडतीस मुदतवाढ..


मुंबई /-

म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ घरांच्या सोडतीसाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.म्हाडाच्या कोकण मंडळाने बुधवारी संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी, ऑनलाईन ग्नअर्ज सादर, अनामत रक्कम भरणा करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदारांना २९ सप्टेंबरपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील. ऑनलाईन आणि बँकेत आरटीजीएस/एनईएफटीमार्फत अनामत रकमेचा भरणा १ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११.५९ वाजेपर्यंत करता येणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in, https://mhada.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या यादीबाबत दावे-हरकती ५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३पर्यंत दाखल करता येतील.स्वीकृत अर्जांची अंतिम यादी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जाहीर केली जाईल, असे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी सांगितले. संगणकीय सोडतीचा कार्यक्रम ठरल्यानुसार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा