You are currently viewing आयकर विभागाची मोठी करवाई; मुंबई-पुण्यात 40 ठिकाणी छापे..

आयकर विभागाची मोठी करवाई; मुंबई-पुण्यात 40 ठिकाणी छापे..

मुंबई /-

राज्यात आयकर विभागाकडून पुन्हा एकदा मोठी करवाई करण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ठिकाणांचाही समावेश आहे. पुण्यातील एका मोठ्या उद्योजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही छापेमारी सुरू करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जयराज ग्रुपसह प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तसेच जयंत शाहा यांच्या कार्यालयावर ही कारवाई करण्यात आली असून कागदपत्राची तपासणी सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. यासोबतच महाराष्ट्रातील मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील काही ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली आहे.

आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात झाडाझडती सुरू आहे. पुण्यातील ज्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या संबंधित ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे त्या व्यावसायिकाचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यासोबत जवळचा संबंध असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात 25 ऑगस्ट 2021 रोजी आयकर विभागाने महाराष्ट्र आणि गोव्यात विविध ठिकाणी छापेमारी केली होती. ही छापेमारी 44 हून अधिक ठिकाणांवर करण्यात आली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा