You are currently viewing विकृतीचा कळस!३० नराधमांनी मिळून अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार; गुन्ह्यात मुलीच्या प्रियकराचाही समावेश

विकृतीचा कळस!३० नराधमांनी मिळून अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार; गुन्ह्यात मुलीच्या प्रियकराचाही समावेश

मुंबई /-

राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नुकताच साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून निघाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका अशीच एकच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्वेला मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची अल्पवयीन आहे. आरोपींचा शोध सध्या सुरु आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी हा सगळा प्रकार उघडकीस आला. डोंबिवलीच्या भोपर परिसरात ही घटना घडली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० आरोपींनी मिळून सामूहिक बलात्कार केला . आरोपींमधील २२ जणांना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीच्या प्रियकराने जानेवारीमध्ये बलात्कार करताना व्हिडीओ काढला आहे. या व्हिडीओच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल केले जात होते. यानंतर मुलीला फार्म हाऊसवर नेऊन आरोपींकडून आळीपाळीने बलात्कार करण्यात आला. बुधवारी हा सगळा प्रकार उघडकीस आला असून मानपाडा पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा