You are currently viewing सावंतवाडी – खासकिलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नं. ४ कडे जाणाऱ्या रस्त्यांची पुरती दुर्दशा डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी..

सावंतवाडी – खासकिलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नं. ४ कडे जाणाऱ्या रस्त्यांची पुरती दुर्दशा डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी..

सावंतवाडी /-


सावंतवाडी – खासकिलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नं. 4 कडे जाणाऱ्या रस्त्यांची पुरती दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना रस्ता शोधत मोठी कसरत करावी लागत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने शहरातील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.
सावंतवाडी – खासकिलवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नं. 4 कडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे पाण्याने भरल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. जागोजागी डांबर उखडल्यामुळे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण्ा झाले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करुन हा रस्ता सुस्थितीत करावा अशी मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा