You are currently viewing केंद्रप्रमुख संघटनेने दिले आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत निवेदन !

केंद्रप्रमुख संघटनेने दिले आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत निवेदन !

कुडाळ /-

केंद्रप्रमुखांच्या विविध मागण्या मान्य करण्याबाबतचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ,जिल्हा सिंधुदुर्ग या संघटनेने आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत दिले आहे
निवेदनात म्हटले आहे की जि.प. शिक्षण विभागात प्रवेक्षीय यंत्रणा म्हणून कार्य करणाऱ्या केंद्र प्रमुखांची पद निर्मिती १९९५ साली झाली. या मधल्या काळात त्यांच्या काही न्याय मागण्या पुढे आल्या आहेत त्या मान्य मागण्यांमध्ये केंद्रप्रमुखांचा जिल्हा तांत्रिक सेवेत समावेश करणे, केंद्रप्रमुखांना वर्ग २ ची (गट शिक्षणाधीकारी, उपशिक्षणाधीकारी) पदोन्नती मिळणे. केंद्रप्रमुखांना सेवा निवृत्तीच्या वेळेस अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ मिळणे. शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी २ पदोन्नती साठी फक्त केंद्र प्रमुखांचाच विचार व्हावा तसेच या पदोन्नती साठी ५०% गुणासह उत्तीर्णची अट शिथिल करण्यात यावी. केंद्रप्रमुखांच्या प्रवास भत्यात सुधारणा करणे.अभावित केंद्र प्रमुखांना कायम करणे. केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागांमुळे ज्यादा केंद्राचा प्रभार असणाऱ्या केंद्रप्रमुखांना अतिरिक्त वेतन मिळणे. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन केंद्रप्रमुखांना गुणवंत केंद्रप्रमुख पुरस्काराने गौरविणे. याप्रमाणे त्यांच्या मागण्या असून त्या मंजूर,करण्याकरिता मी आपणास शिफारस करीत आहे.असे पत्र आमदार वैभव नाईक यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे महा.राज्य केंद्र प्रमुख संघ सिंधुदुर्गने हे निवेदन आमदार वैभव नाईक यांना दिले यावेळी जिल्हा सचिव-शिवाजी गावीत,सह सचिव-रामचंद्र वालावलकर ,सदस्य-अनंत कदम,कुडाळ अध्यक्ष-भास्कर पुरळकर ,उपस्थित होते.कणकवली केंद्रप्रमुखांच्या विविध मागण्या मान्य करण्याबाबतचे निवेदन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, जिल्हा सिंधुदुर्ग या संघटनेने आमदार वैभव नाईक यांच्यामार्फत दिले आहे.

अभिप्राय द्या..