कुडाळ /-

मुंबई – गोवा महामार्गावर तोरसे बीएड कॉलेज नजीकच्या धोकादायक वळणावर दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरुन नोकरीनिमित्त जाणाऱ्या कुडाळ येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. योगेश परब (२७, रा. कुडाळ) असे त्याचे नाव असल्याचे समजते. गोव्यात कामानिमित्त जात असताना त्याच्या मोटरसायकलची समोरुन सुसाट वेगात येणाऱ्या कंटेनरला धडक बसली. स्थानिक ग्रामस्थांसह पेडणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page