You are currently viewing नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना संपावर…

नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना संपावर…

कणकवली /-

संपुर्ण राज्यातच नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना , महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने मंगळवार २१ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक विभागकार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप न केल्याने बेमुदत संप पुकारला आहे.त्याचा फटका मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री व्यवहारावर झाला आहे.चाकरमान्यांना देखील संप असल्याने मुक्काम वाढवावा लागत आहे.तसेच सर्व सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे,त्यामुळे शासनाने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अप्पर मुख्य सचिव , महसुल , मुद्रांक व नोंदणी महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे दालनात झालेल्या चर्चेमध्ये दिलेल्या आश्वासनानुसार संघटनेकडून करण्यात आलेल्या खालील नमूद मागण्यांमधील कोणत्याही मागणीची पुर्तता न झाल्यामुळे २१ सप्टेंबरपासून संघटनेकडून बेमुदत संप करण्यात आला आहे . संघटनेच्या खालील प्रमुख मागण्या- 01. नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरीत करणे . 02. पदोन्नतीची कार्यवाही पुर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे . 03. विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे . 04. विभागातील वरिष्ठ लिपिक / कनिष्ठ लिपिक यांच्या जेष्ठता यादया सन 2018 पासून प्रलबीत आहेत त्या अंतीम करून तात्काळ प्रसिध्द करणे . 05. मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे पदे विभागातील पदोन्नतीने भरणे . 06. कोवीड -19 मुळे मयत झालेले विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचे कुटूंबियांना तात्काळ 50 लाखाची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीत सामावून घेणे . 07. स्विय प्रपंची लेख्यातील रक्कम विभागातील कार्यालयांच्या व जनतेच्या सुविधेकरिता वापरणे . 08. तुकडेबंदी तसेच रेरा कायदयान्वये नोंदणी विभागातील अधिकारी / कर्मचारी यांचेवर करण्यात आलेल्या कारवाई मागे घेणे . 09. आय- सरिता , ई- फेरफार तसेच इतर सर्व्हरच्या अडचणी तात्काळ दुर करणे . 10. आयकर विभागाकडील विवरण पत्र , पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी करण्यात आलेली माहिती केंद्रीय सर्व्हरवरूण पुरविणे . 11. नोंदणी अधिकारी यांचेविरूध्द काहीही संबध नसताना संगनमत या कारणामुळे दाखल होणारे गुन्हे मागे घेणे . 12. नविन आकृतीबंधानुसार शिपाई संवर्गातील पदे निरसीत न करता कायम ठेवणे . 13. निनावी व त्रयस्थ व्यक्तीद्वारे होणा – या तक्रारीचे आधारे कार्यवाही प्रस्तावित न करणेबाबत . 14. सह दुय्यम निबंधक वर्ग -2 व दुय्यम निबंधक श्रेणी -1 संवर्गाचे एकत्रीकरण करणे . 15. पदनामामध्ये बदल करणे . 16. विभागीय पदोन्नती समितीमध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घेणे . 17.खात्याची विभागीय परिक्षा प्रत्येक वर्षी घेणे . 18. विभागीय चौकशीची कार्यवाही विहित मुदतीत पार पाडणे . 19. सर्व संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल दरवर्षी विहित मुदतीत पुर्ण न केल्यास संबधीत अधिकारी यांचेवर कारवाई प्रस्तावित करणे . 20. शासन निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही करतांना त्या वर्षी रिक्त असलेली पदे त्याच वर्षात भरणे . 21. बदल्या करतांना संघटनेस विचारात घेणे ,अश्या मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याने बेमुदत संप पुकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली सह जिल्ह्यातील सर्व नोंदणी व मुद्रांक विभाग कार्यालयातील कामकाज बंद आहे. त्यामुळे सर्व कार्यालयांच्या आवारात शुकशुकाट पसरला आहे. गणेश चतुर्थी नंतर मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री व्यवहार चाकरमानी करत असतात .त्यांनाही त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. या मागण्यांकडे तातडीने शासनाने लक्ष देऊन मार्ग काढण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

अभिप्राय द्या..