You are currently viewing गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दत्‍तराम बेंद्रे यांचे कुडाळ भंगसाळनदी पात्रात बुडून मृत्यू..

गणेश विसर्जनासाठी गेलेल्या दत्‍तराम बेंद्रे यांचे कुडाळ भंगसाळनदी पात्रात बुडून मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ भंगसाळ नदी येथे गणेश विसर्जन करून पाण्यात पोहताना मुंबई प्रभादेवी येथील ६५ वर्षीय दत्‍ताराम बाळू बेंद्रे यांचे पाण्यात बुडून निधन झाले याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.
कुडाळ शहरातील भैरववाडी मंदिर नजीक असलेल्या अभय गणपत राऊळ यांच्या निवास्थानी विराजमान झालेल्या गणेशाचे आज (सोमवारी) अकरा दिवसांनी विसर्जन होते आणि या विसर्जनासाठी त्यांचे मुंबई प्रभादेवी येथील मित्र दत्ताराम बेंद्रे हे आले होते दुपारी गणेशाचा महाप्रसाद करून गणेशाचे विसर्जन करण्यासाठी अभय राऊळ यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे मुंबई येथील सर्व मित्र भंगसाळ नदीच्या ठिकाणी विसर्जनासाठी ते गेले त्या ठिकाणी विसर्जनासाठी मदत करणारे शेलटे व अभय राऊळ यांचे मुंबईतील मित्र गणेशाची मूर्ती घेऊन पाण्यात उतरले गणपतीचे विसर्जन झाले. विसर्जन झाल्यावर दत्ताराम बेंद्रे हे पाण्यात पोहत असताना अचानक गटांगळ्या खाल्ल्या तेथे असलेल्या शेलटे यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला पाण्याबाहेर काढून कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले मात्र तत्पूर्वी त्यांचे निधन झाले होते याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले

गेले अनेक वर्ष विसर्जनासाठी येतात

अभय गणपत राऊळ हे मुंबई येथील उद्योजक आहेत आणि त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाच्या विसर्जनाला दरवर्षी त्यांचे मुंबई येथील मित्र येतात दत्ताराम बेंद्रे हे सुद्धा गेले अनेक वर्ष विसर्जनासाठी येतात मात्र यावर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातला विसर्जनासाठी गेले असताना पाण्यात बुडून त्यांचे निधन झाले.

अभिप्राय द्या..