कणकवली /-

मुंबई – गोवा महामार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी येथे प्रवाशांसाठी तसेच येथील नागरिकांसाठी आवश्यक असलेली एस. टी. बस निवारा शेड बांधली न गेल्यामुळे आज सोमवारी नडगिवे ग्रामस्थांनी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली प्रांताधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन एस. टी. बस थांबा निवारा शेड बांधून देण्याची मागणी केली.

यावेळी नडगिवे बांबरवाडी येथील एकूण ३२ नागरिकांच्या सह्या असलेले लेखी निवेदन प्रांताधिकारी कणकवली यांना देण्यात आले. यावेळी नडगिवे बांबरवाडी येथील कार्यकर्ते रवींद्र आंबेरकर, रघुनाथ आंबेरकर, प्रमोद आंबेरकर, गोपीनाथ पाटील तसेच खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते महेश कोळसुलकर, संतोष पाटणकर, मंगेश गुरव, योगेश पाटणकर, महेंद्र गुरव ऋषी राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबई – गोवा महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने महामार्गाचे काम करत असताना खारेपाटण नडगिवे बांबरवाडी येथे पूर्वापार असलेला एस. टी. बस थांबा निवारा शेड पाडण्यात आला व नवीन चौपदरीकरण रस्ता बनविण्यात आला. मात्र येथील नागरिक तथा प्रवासी वर्गाची गरज असलेला एस. टी. बस थांबा प्रवासी निवारा शेड पुन्हा बांधण्यात आला नाही. परिणामी या एस. टी. बस थांब्याबर अवलंबून असणाऱ्या वाणीवाडी, धावडेवाडी, गुंडयेवाडी व गावठणवाडी येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबत आज महाराष्ट्र् राज्य एस. टी. महामंडळ विभागीय कार्यलय कणकवली येथे विभाग नियंत्रक प्रमुख श्री. रसाळ यांची नडगिवे बांबरवाडी येथील ग्रामस्थांनी भेट घेऊन नडगिवे बांबरवाडी येथे प्रवाशी निवारा बस थांबा शेड बांधून देण्याची मागणी केली.

तसेच नडगिवे बांबरवाडी ही मुंबई – गोवा महामार्गावरील एक जागृत वाडी असून या मार्गावर लागूनच आदिष्टी मातेचं मंदिर असल्याने बरेचसे भाविक नडगिवे बांबरवाडी या एस. टी. बस थांब्यावर उतरतात. तसेच कुरंगावणे खैराटवाडी येथील ग्रामस्थ देखील याच बस स्टँडवर उरतात. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून नडगिवे बांबरवाडी एस. टी. बस थांबा निवारा शेड लवकरात लवकर बांधण्यात यावी, अशी मागणी नडगिवे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद आंबेरकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page