You are currently viewing देशात कुठेही फिरताना आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक सोबत ठेवण्याची गरज नाही..

देशात कुठेही फिरताना आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक सोबत ठेवण्याची गरज नाही..

नवी दिल्ली /-

देशाच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आता वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी बुक) सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही. आता रस्त्यावर वाहन चालक ट्रॅफिक पोलीस आणि परिवहन विभागाला डिजी-लॉकर प्लॅटफॉर्म किंवा एम-परिवहन मोबाइल अ‍ॅपमध्ये डिजिटल प्रकारे ठेवलेली कागदपत्रे दाखवू शकतात.
 
 
केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या या आदेशानंतर सर्व राज्यात एम-परिवहन अ‍ॅप आणि डिजी लॉकरमधील कागदपत्र मान्य करावी लागतील. आता यास कायदेशीर मान्यता सुद्धा प्रदान करण्यात आली आहे. या आदेशानंतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वृत्तपत्रांमध्ये याबाबत जाहिरात देऊन लोकांना जागृत करण्यात येत आहे. जर आता तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाच्या रजिस्ट्रेशनचे कार्ड एम-परिवहन मोबाइल अ‍ॅप आणि डीजी लॉकरमध्ये असेल तर ते देशभरात मान्य असेल. आतापर्यंत एम-परिवहन अ‍ॅपवर हे कागदपत्र उपलब्ध होते, परंतु त्यांना कायदेशीर मान्यता दिली जात नव्हती, परंतु आता त्यास कायदेशीर मान्य करण्यात आले आहे.
डीजी लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांना आता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मान्य करण्यात आले आहे. परिवहन विभाग आता एम परिवहन मोबाइल अ‍ॅप आणि डीजी लॉकरमध्ये ठेवलेल्या कागदपत्रांना मान्यता देण्यासाठी मोटर व्हेईकल अ‍ॅक्ट अंतर्गत नोटिफिकेशन सुद्धा जारी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा