You are currently viewing वेंगुर्ले भाजपा च्या वतीने सेवा आणि समर्पण अभियान

वेंगुर्ले भाजपा च्या वतीने सेवा आणि समर्पण अभियान

वेंगुर्ला /-


राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ” सेवा आणि समर्पण अभियान ” विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरे करण्यात येणार आहे .यामध्ये लसीकरण केंद्रांना भेटी देऊन ” जनजागृती व सेवाकार्य ” करण्यात येणार आहे.वेंगुर्ले भाजपा च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले व मठ ग्रामपंचायत या दोन ठिकाणी लसीकरण केंद्रावर भेट देऊन रत्नागिरी – सिंधुदुर्ग चे संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी व सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी व लसीकरणात सहभागी नागरिकांना सन्मानित करण्यात आले.यावेळी संघटनमंत्री शैलेंद्रजी दळवी यांनी जगातील सर्वात मोठे लसीकरण अभियान मोदी सरकारच्या माध्यमातून झाल्याचे सांगितले . तसेच आतापर्यंत देशातील ७० कोटी जनतेचे लसीकरण झाल्याचे सांगितले .त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त २ कोटी जनतेचे लसीकरण होणार अशी माहिती दिली.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, ता. सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , रविंद्र शिरसाट, ज्ञानेश्वर केळजी, विजय बागकर, रुपेश राणे, महादेव नाईक, सुधीर गावडे, युवा मोर्चा चे समिर नाईक, अनिल तेंडोलकर , राघोबा गावडे, राहुल परब आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..