You are currently viewing छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन..

छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित २२ सप्टेंबरला रक्तदान शिबिराचे आयोजन..

कणकवली /-


कणकवली येथील छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. आ. केंद्र वरवडे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरुण तरुणींनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन गरजूंना रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार दि. २२ सप्टेंबर, २०२१ सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते ५५ वर्षे वयोगटातील तरुण तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे. ज्यांची पाहिली किंवा दुसरी कोविड प्रतिबंधात्मक लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांनाही रक्तदान करता येईल, असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा.
धनंजय सावंत :- 9404936944
संदेश कडुलकर :- 9637432223
अमेय मडव :- 9619326057
संतोष मेस्त्री :- 7218518713
अनुप वारंग :- 9822361036

अभिप्राय द्या..