You are currently viewing चेंदवण ठुंबरेवाडी येथील एका शेतात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह..

चेंदवण ठुंबरेवाडी येथील एका शेतात आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील चेंदवण ठुंबरेवाडी येथील एका शेतात एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे ही महिला सुमारे 50 ते 55 वयोगटातील असून नूतन बऱ्याच प्रमाणात कुजल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाच पंधरा वाजता निदर्शनास आली. चेंदवण मधील एक इसम चेंदवण ठोंबरेवाडी तील आपल्या नातेवाईकांकडे गणपती विसर्जनासाठी सांगण्यासाठी जात होते .यावेळी शेतामधून पायी चालत जात असताना शेतामध्ये एकाठिकाणी दुर्गंधी येऊ लागली व त्या ठिकाणी माशा घोंगावत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन त्यांनी पाहिल्यावर त्या ठिकाणी त्यांना एका महिलेचा मृतदेह उपड्या स्थितीत दिसून आला. त्यांनी तात्काळ या बाबत गावच्या पोलीस पाटील यांना माहिती दिली त्यानंतर निवती पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली यानंतर आजूबाजूच्या परिसरात कोणती महिला बेपत्ता आहे का याची माहिती घेतली. मात्र दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत या महिलेची ओळख पटू शकली नाही. या महिलेचा मृतदेह शेतात कसा आला ?आत्महत्या आहे की घातपात? याबाबत या परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

अभिप्राय द्या..