You are currently viewing पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या चळवळीस आपला पुर्ण पाठिंबा राहिल. सुरेश प्रभू

पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या चळवळीस आपला पुर्ण पाठिंबा राहिल. सुरेश प्रभू


मालवण /-


पर्यटन व्यवसायिक महासंघाने पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी सुरू केलेली ही चळवळ जिल्ह्याला एक नवी दिशा देणारी असुन जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला या चळवळीत सहभागी करण्याचा महासंघाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. यासाठी लागणार सहकार्य देण्यास आपण सदैव तत्पर आहोत असे आश्वासन आज माजी केंद्रीय मंञी आणि खासदार सुरेश प्रभू यांनी दिले.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज त्यांच्या मालवण येथील निवासस्थानी भेट घेतली व महासंघाच्या वतीने दिनांक २७सप्टेंबर रोजी मालवण येथे आयोजित केलेल्या जागतिक पर्यटन दिनाच्या कार्यक्रमाचे नियंञण दिले तसेच महासंघाच्या वतीने भविष्यात जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या रोजगाराभिमुख उपक्रमांची माहिती दिली. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत या जिल्ह्यात शाश्वत विकासासाठी आग्रह धरुन महासंघाने काम करण्याबाबत प्रभू यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री विष्णू उर्फ बाबा मोंडकर, जिल्हा सचिव अॅड. नकुल पार्सेकर, खजिनदार श्री गुरुनाथ राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री जितेंद्र पंडित, मालवण तालुकाध्यक्ष श्री अविनाश सामंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..