वेंगुर्ला /-


तालुक्यातील कोचरा वासियांची मागणी असलेला येथील बीएसएनएल टॉवरचे लोकार्पण खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते बुधवार ८ सप्टेंबर रोजी करण्यात आले.कोचरा गावात कोणतेही नेटवर्क नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी सुद्धा मोठे अडथळे येत होते.हा बीएसएनएल टॉवर सुरू होण्यासाठी सरपंच साची फणसेकर यांनी वारंवार पाठपुरावा करून हा बीएसएनएल टॉवर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांनी हे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.यानुसार काम पूर्ण होऊन टॉवरच्या लाईट कनेक्शन साठी मोठया निधीची गरज होती. तेवढा निधी बीएसएनएल कडे नसल्याने टॉवर कार्यान्वित होण्याच्या प्रतिक्षेत होता.दरम्यान यासाठी तात्काळ सरपंच यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर यांचे लक्ष वेधले.यावेळी तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले होते.यानुसार तात्काळ कार्यवाही करून जिल्हा नियोजन मधून यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यानुसार याचे सर्व काम पूर्ण झाले असून बीएसएनएल टॉवर कार्यान्वित झाल्याने ग्रामपंचायतच्या मागणी पूर्ण होऊन याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी टॉवर साठी निधी दिल्या बद्दल खासदार विनायक राऊत यांचा, कोचरा गावाला विकास कामांसाठी वेळोवेळी भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार दिपक केसरकर यांचा, या टॉवरसाठी जमीन दिल्याबद्दल जमीन मालक मनोहर तेली यांचा शाल, श्रीफळ, पुष्प व शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गटनेते नागेंद्र परब, जि.प. सदस्य अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक , वेंगुर्ले शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, बीएसएनएल चे अधिकारी, सरपंच साची फणसेकर, निवती सरपंच भारती धुरी, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, भोगवे माजी सरपंच महेश सामंत, निवृत्त नायब तहसीलदार सुभाष चौधरी, ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा पाटकर, पूजा गोसावी, सरस्वती राऊळ, स्वरा हळदणकर, सोसायटी चेअरमन ब्रिजेश तायशेट्ये, म्हापण शिवसेना विभाग प्रमुख योगेश तेली, उपविभाग प्रमुख वसंत साटम, केळुस माजी सरपंच योगेश शेट्ये, म्हापण उपसरपंच अशोक पाटकर, ज्येष्ठ शिवसैनिक बाळा हंजणकर, शाखा प्रमुख आपा राऊळ, भोगवे सोसायटी चेअरमन चेतन सामंत, ग्रामसेवक प्रविण भोई आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page