You are currently viewing खड्डे मय बनलेल्या चिंदर भगवंत गड रस्त्यावर मनसे युवा शक्ती तर्फे श्रमदानातून खड्डे बुजवले.

खड्डे मय बनलेल्या चिंदर भगवंत गड रस्त्यावर मनसे युवा शक्ती तर्फे श्रमदानातून खड्डे बुजवले.

आचरा /-

आचरा भगवंत गड रस्ता खड्डेमय बनल्याने वाहतूकीस धोकादायक बनला होता.चतुर्थी कालावधीत वाढत्या वाहतूकीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेत चिंदर येथील मनसेचे युवा कार्यकर्ते निखिल माळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर खोत,सागर परुळेकर,स्वप्नील वराडकर, रुपेश परुळेकर,अजिंक्य सुर्वे, निखिल वराडकर,बाबू घागरे, गणेश झोरे,अनिकेत साटम,पिंटू परब,संतोष मुणगेकर,विजय माळकर.दीपेश लब्दे,दिपक लाड,दादा माळकर,वैभव साळकर,अमोल मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या कार्याचे चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांनी कौतुक केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा