सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर मिस युनिव्हर्स २०२१ ची ठरली उपविजेती..

सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर मिस युनिव्हर्स २०२१ ची ठरली उपविजेती..

सावंतवाडी /-

नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर हिने उपविजेतेपद पटकवले मुंबई तील प्रसिद्ध जाईल एंटरटेनने भाईंदर येथील सुवी पॅलेस येथे ही स्पर्धा आयोजित केली होती महाराष्ट्राबरोबर हिमाचल प्रदेश आसाम बिहार आदी भागातील सौंदर्यवती या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या सौंदर्य व बुद्धिमत्ता यांचा कस लागणारी ही स्पर्धा होती अंतिम फेरीत सर्व स्पर्धकाना आजच्या पिढीचा सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता? हा प्रश्न विचारला होता मूल्य संस्कार, काळ व काळाचे अंतर…या भक्तीने दिलेल्या उत्तराला सर्व परीक्षकांनी कौतुक केले सहनशीलता, कठोर मेहेनत, वाचन व सातत्य यामुळेच मोठ्या स्पर्धेचे उपविजेतेपद मला पटकवता आलें…अशी प्रतिक्रिया भक्ती जामसंडेकर हिने लोकसंवाद लाईव्ह या न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केली आहे.या स्पर्धेला प्रमुख पाहुणे मयुरी शुभानंद (टीव्ही अभिनेत्री) बाबू पटेल – व्यवसायिक,कुणाल ठक्कर – सहयोगी भागीदार ,राकेश सभरवाल (निर्माता आणि दिग्दर्शक) हे उपस्थित होते.सहयोगी भागीदार म्हणून,प्रिया राणा (ऑफिशियल ग्रूमर आणि कोरिओग्राफर) कुणाल ठक्कर – सहयोगी भागीदार राकेश सभरवाल (निर्माता आणि दिग्दर्शक) उपस्थित होते.

अभिप्राय द्या..