You are currently viewing भाजपा नेते किरीट सोमय्या उद्द्या३ सप्टेंबरला येणार सिंधुदुर्गात..

भाजपा नेते किरीट सोमय्या उद्द्या३ सप्टेंबरला येणार सिंधुदुर्गात..

कणकवली /-

भाजपाचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या उद्या ३ सप्टेंबरला सिंधुदुर्गात आम. नितेश राणे यांच्या सोबत दाखल होत आहेत.किरीट सोमय्या यांनी नुकताच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना दापोलीतील अनाधिकृत रिसॉर्ट प्रकरणी धक्का दिला होता. आता त्यांनी आपला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाकडे वळवला आहे. ३ सप्टेंबर रोजी कणकवली येथे ते पत्रकार परिषद घेणार असून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा घोटाळा आणि संचयनी इन्व्हेस्टमेंट या संदर्भात ते पाठपुरावा करणार आहेत. अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करत सोमय्या यांनी त्यांना रडारवर घेतले आहे. आमदार नितेश राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गात कणकवली मध्ये येत असल्याचे ट्विट सोमय्या यांनी केले आहे. ‘परिवहन मंत्री अनिल परब यांचा घोटाळा पाठपुराव्यासाठी मी उद्या सिंधुदुर्गात कणकवली येथे जात आहे’, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आता या प्रकरणी काय भूमिका मांडतात, ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अभिप्राय द्या..