You are currently viewing प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविणार..

प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविणार..

कुडाळ /-

प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक ) दिनांक ५ सप्टेंबर २०२१ पासून मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविणार प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता आँनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थी, पालक, शिक्षक भरडले जात आहेत.

ग्रामीण भागात इयत्ता ८ ते १२ वीचे वर्ग कोरोना नियमांचे पालन करून सुरू आहेत.
मागील वर्षी मार्च २०२० पासून प्राथमिक शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यास्तव प्राथमिक शाळा सुरू करणेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद(प्राथमिक ) दिनांक ५ सप्टेंबर २०२१ पासून शिक्षण बचाव मोहीम सुरू करीत आहे. या माध्यमातून विद्यार्थी, पालक, शिक्षक हे पत्राद्वारे तर शिक्षक परिषद तालुका, जिल्हा, विभाग, राज्य निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक) सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी दिली.

अभिप्राय द्या..