जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या बैठकीत निर्णय..

आचरा /-


गेले दीड दोन वर्षे कोरोनामुळे मालवण बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन व्यवसाय डबघाईस आला असल्याने पर्यटन उद्योग व इतर व्यवसायांना उर्जितावस्था आणण्याच्यादृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने ठोस पावले उचलली आहेत त्याचा एक भाग म्हणून मालवण शहराचा पर्यटन विकास आराखडा तयार करून तो
मालवण नगरपालिकेला तसेच शासनाला सादर करावा या कामी श्री मंगेश जावकर आणि सौ पूनम चव्हाण यांनी मालवण न.प. चे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेऊन चर्चा करावी अशा आशयाचा ठराव सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ मालवण तालुक्याच्या बैठकीत संमत करण्यात आला. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा पर्यटन समितीच्या जिल्हाध्यक्षपदी श्री.दामोदर तोडणकर यांची निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ तालुका मालवणची बैठक तालुकाध्यक्ष अविनाश सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर, शेखर गाड, दामोदर तोडणकर, प्रफुल्ल देसाई, मेघा सावंत, अनिल चव्हाण, सौ. मंदा जोशी, सौ. विद्या फर्नांडिस, संध्या कीर्तने, शैलजा पाटील, नम्रता माडये, पूनम चव्हाण, फॅनी फर्नांडिस, गीताली आडकर, विजय साळकर, पंकज पेडणेकर, उदय गावकर, तुकाराम गावडे, क्षितिज हुनारी, गौरव वळंजू, रामचंद्र पवार, प्रफुल्ल पवार, महेश जुवाटकर आदी व इतर उपस्थित होते.

या बैठकीत पर्यटन व्यवसाय वाढीसाठी काय करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. या चर्चेत मालवणचे प्रमुख आकर्षण असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला दरवर्षी आठ ते दहा लाख पर्यटक भेट देत असतात. हे जरी खरे असले तरी मालवण तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे असून ती आजही उपेक्षित राहिली आहेत. या पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने काय करता येईल याविषयी त्या त्या गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करावी व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या या कार्यात त्यांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे गावगावातील बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना मार्केटिंग व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली.

विविध पदाधिकाऱ्यांची निवड

या बैठकीत महासंघाचे मालवण तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये संघटनेच्या मालवण तालुका सचिव पदी पंकज पेडणेकर यांची निवड करण्यात आली. तसेच तालुक्यात आचरा, मसुरे, देवबाग, श्रावण, पोईप या विभागांचे मीडिया विभागीय अध्यक्ष निवडण्यात आले. यामध्ये अर्जुन बापर्डेकर (आचरा), संदीप बोडवे ( देवबाग), दत्तप्रसाद पेडणेकर (मसुरे), गणेश चव्हाण (श्रावण), संतोष हिवाळेकर (पोईप) यांचा समावेश आहे. शेवटी शेखर गाड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page