You are currently viewing शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ऑफिस, घरावर ईडीच्या धाडी..

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या ऑफिस, घरावर ईडीच्या धाडी..

मुंबई /-

शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या 5 संस्थांवर ईडीने धाडी टाकल्याची बातमी समोर येत आहे.

भाजपचे खासदारा किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यातच आज भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीने धाडसत्र सुरु केल आहे. भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या असल्याच सुद्धा बोलले जात आहे.

अभिप्राय द्या..