मनसे कामगार सेना रिटायर एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी लढा देणार.;जेडी नाडकर्णी.

मनसे कामगार सेना रिटायर एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांसाठी लढा देणार.;जेडी नाडकर्णी.

कुडाळ /-

दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचे हाल बिकट होत चाललेले असून त्यामध्ये करोनाच्या काळामध्ये परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे कित्येक कर्मचाऱ्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. बँकेचे हप्ते, मुलाचे शिक्षण, कोरोना चा वाढता विळखा, महागाई, दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला असून लोकांना आता मरण यातना भोगाव्या लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्याचे जीवन मेटाकुटीला आलेले आहे. त्यात रिटायर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे पेन्शन व रिटायरमेंट चे फंड सुद्धा प्रशासन त्यांना देत नाही आहे. हक्काचे पैसे निवृत्त होऊन मिळत नसल्याने सेवानिवृत्त झालेल्या लोकांना आता आत्महत्या करण्याची वेळ प्रशासनाने आणली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेला अशी आता माहिती प्राप्त झालेली आहे की रिटायर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या फंडाच्या पैशाचा पण गैरवापर प्रशासनाने केलेला असून त्याची गंभीर दखल आता महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना घेणार आहे व तसे आदेश मा. हरी माळी यांनी सर्व पदाधिकारी यांना दिलेल्या असून सर्व कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना कटीबद्ध असणार असल्याचे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

अभिप्राय द्या..