You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल.;भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची माहिती.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल.;भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची माहिती.

मुंबई /-

सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबलेली आहे. नारायण राणे सद्या मुंबईत आहेत, आज दुपारी ते आपले रूटीन चेकअप साठी लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. हे चेकअप नेहमीप्रमाणे सामान्य चेकअप असून कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपहार्य विधान केल्याबद्दल दोन दिवसांपासून केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आराम मिळालेला आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे सद्य:स्थितीत मुंबईत असल्यामुळे त्यांनी आज दुपारी लीलावती रुग्णालयात जाऊन आपले दैनंदिन चेकअप केलेले आहे. अशीही माहिती आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

अभिप्राय द्या..