You are currently viewing भाजपा शिवसेनेत राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क..

भाजपा शिवसेनेत राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क..

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी,कणकवलीत अनुसूचित प्रकार घडू नये, पोलीस सज्ज..

कणकवली /-

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कणकवलीत पोलिसांनी संचलन केले.सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले आहेत. कणकवली शहरांमध्ये 6 अधिकारी व शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य चौक,महामार्ग नरडवे नाका,रेल्वे स्टेशन व पटकी देवी बाजारपेठ या ठिकाणी पोलिसांनी संचलन चालू आहे. कणकवलीत कुठलाही अनुचित प्रकार,राडा घडला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा मॅसेज पोलिसांनी दिला आहे.हे संचलन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या नेतृत्वाखाली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल पडसाद उमटले .त्यानंतर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.कणकवली तालुक्यात सहा दंगल नियंत्रण पथक, एसआरपीएफ यांच्यासह १३५ अंमलदार, ६ अधिकारी, पुणे ठाणे ग्रामीण एसआरपीएफ, पुणे तीन प्लाटून अशी शेकडो पोलिसांची फौज कणकवलीत दाखल होत संचलन केले आहे.

अभिप्राय द्या..