वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले शहरांत प्रतिवर्षी प्रमाणे साजरा होणारा गणेश उत्सव दरवर्षी होणाऱ्या नियोजनाप्रमाणे करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. या गणेश चतुर्थी कालावधीत बॅनर व जाहिराती लावण्यासंदर्भात नगरपरिषदेतर्फे परवानगी व फि भरून घेऊन बॅनर लावण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच नगरपरीषदेच्या एल. ई.डी. स्क्रिनवर जाहिराती देणाऱ्यांनी सदरची फि भरून जाहिरात देण्यासाठीहि मंजुरी देण्यांत आली.वेंगुर्ले नगरपरिषद कौन्सिलची सर्वसाधारण सभा नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहातून ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ,नगरसेवक सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, विधाता सावंत, पुनम जाधव, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर, कृपा मोंडकर, सुमन निकम, संदेश निकम, आत्माराम सोकटे, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे व नगरपरिषद प्रशासनाचे विविध विभागाचे प्रमुख आदी उपस्थित होते.
या सभेत कोकण हॉस्पीटॅलिटी अँण्ड अँडव्हेन्चर्स यांनी वेंगुर्ले क्रिडांगण व इतर क्रिडा आस्थापनाबाबत विषयानुसार दिलेल्या पत्रावर चर्चा होऊन नगरपरीषदच्या टर्फविकेट क्रिकेट क्रिडांगणाची देखभाल व दुरूस्ती व्हावी. हे मैदान स्थानिक खेळाडूंना वापरण्यास योग्य रहावे. त्याचबरोबर या मैदानावर विविध खेळांची प्रशिक्षणे आयोजित केली जावीत.तसेच वेंगुर्ले शहरात क्रिडा पर्यटनाचा उद्देश सफल व्हावा. हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कोकण हॉस्पीटॅलिटी अँण्ड अँडव्हेन्चर्स यांना ३ वर्षासाठी ते विनामुल्य वापरांस देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
वेंगुर्ले नगरपरिषद क्राफर्ड मार्केटच्या ठिकाणी नुतनीकरण करण्यात आलेल्या सर्व गाळ्यांचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी करण्याचा व ज्या गाळ्यात जे व्यापारी व्यवसाय करीत होते.त्यांनाच ते गाळे नगरपरीषदच्या उपविधीनुसार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.कोकणचे सुपुत्र सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा नागरी सत्कार करण्यास मुजरी देण्यात आली.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील डान्टस कॉलनी भागात पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणांत पाणी साचून वेंगुर्लेकर व त्यांच्या आजूबाजूचे घरांत पाणी जाते,यावर सर्व्हे केला असता सरमळकर घर ते रेडकर घर यांच्या घराजवळील स्मशानभूमीपर्यत जाणाऱ्या व्हाळीत मोठय़ा प्रमाणांत गाळ साचलेला आहे.तसेच व्हाळीचे रिटेनिंग वॉल कोसळली आहे.त्यामुळे सदरच्या ठिकाणी पावसाचे पाणी डॉन्टस कॉलनीत घुसुन लोकांच्या घरांमध्ये जाऊ नये यासाठी व्हाळी साफ करणे व रिटेनिंग वॉलचे कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते करण्यास मंजुरी देण्यास आली.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या जलतरण तलावाच्या देखभालीसाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अभिप्राय द्या..