You are currently viewing स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय परिसरात झाडाला राखी बांधून दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश..

स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय परिसरात झाडाला राखी बांधून दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश..


सिंधुदूर्ग /-

आज.२४/०८/२०२१रोजी सिंधूदुर्ग भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था यांच्या वतीने कार्यकारी मंडळ पदधिकारी यांनी जिल्हा कार्यालयाच्या परिसरातील झाडांना राखी बांधून वृक्षबंधन साजरे केले.
दरवर्षी स्काऊट गाईड संस्थेच्या वतीने रक्षाबंधनचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ,कोरोनाच्या पार्शवभूमीवर शाळा बंद असल्या तरी जिल्हा स्काऊट गाईट पथकातील विद्यार्थ्यांनी घराच्या परिसरातील झाडांना राख्या बांधून हा दिवस साजरा केला.
जिल्हा संस्थेच्या वतीनेही जिल्हा कार्यालय परिसरातील झाडांना राखी बांधून वृक्षबंधन साजरे केले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य आयुक्त एकनाथ आंबोकर,राज्य व जिल्हा कार्यकारी पदाधिकारी नीता राणे,उषा आठल्ये ,रामचंद्र आंगणे अन्वर खान, स्नेहलता राणे,प्रदिप शिंदे,क्लारा डिसोजा,प्रकाश कदम, आर .बी.दळवी, प्रकाश सावंत,दिगंबर पावसकर,अर्चना बागवे,विनयश्री पेडणेकर,मृगाली पालव,जे.डी. पाटील,धोंडू रेडकर,दिनकर तळवणेकर,तन्वी रेडकर,रोहिदास राणे,गुरूदास कुसगावकर,वृषाली पावसकर,संस्था कर्मचारी अंजली माहुरे,शुभांगी तेंडोलकर ,लक्ष्मण मिशाळ आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा चिटणीस स्नेहलता राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा