You are currently viewing आचरा मंडल अधिकारी मेघश्याम पाटील यांचा सत्कार..

आचरा मंडल अधिकारी मेघश्याम पाटील यांचा सत्कार..

आचरा /-

आचरा मंडळ अधिकारी एम एम पाटील यांची बदली आचरा येथून कणकवली येथे झाल्याबद्दल महा इ सेवा केंद्र आचरा आणि आचरा ग्रामस्थ यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

आचरा मंडळ अधिकारी एम एम पाटील यांनी आचरा मंडळ अधिकारी म्हणून पावणे दोन वर्षे अतिशय उत्तम काम केले. आपल्या कार्यकाळात सर्वच स्तरावर उत्तम कामगिरी निभावत स्थानिक लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. सेवानिवृत्त होण्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांची बदली कणकवली तालुक्यात झाली आहे. याबद्दल त्यांचा महा इ सेवा केंद्र आचरा च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महा इ सेवा केंद्र चालक सुनील खरात, जगदीश पांगे, नंदकिशोर सावंत, भटवडी तलाठी योगेश माळी, सुरज जोशी, संतोष सावंत, विजय पालव, प्रकाश पालव, यशश्री गोसावी, भक्ती चिंदरकर, अक्षया सारंग यांसह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..