You are currently viewing सावंतवाडीत शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध !

सावंतवाडीत शिवसेनेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निषेध !

सावंतवाडी /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात चुकीचे वक्तव्य केल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले आहेत.या चुकीच्या वक्तव्याचा सावंतवाडीतील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सावंतवाडी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे सादर करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा प्रवक्ते नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, शहरप्रमुख बाबू कुडतरकर, जिल्हा संघटक शब्बीर मणियार, ॲड.नीता गावडे, नगरसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, जि.प.सदस्य मायकल दसोजा, मेघःश्‍याम काजरेकर, चंद्रकांत कासार, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सागर नाणोसकर, अजित सांगेलकर, गजानन नाटेकर, नामदेव नाईक, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते.
भाजपची जन आशिर्वाद यात्रा हा पक्षाचा कार्यक्रम आहे. येत्या दोन ते तीन दिवसात ही यात्रा सावंतवाडीत येईल. सावंतवाडी एक शांत आणि सुसंस्कृत शहर आहे. कोरोना महामारीच्या काळात या जन आशिर्वाद यात्रेमुळे सावंतवाडी शहराची कायदा, सुव्यवस्था बिघडत असेल तर सावंतवाडीतील जन आशीर्वाद यात्रेला परवानगी दिली जाणार नाही. कोरोनाची महामारीची तिसरी लाट रोखण्याबाबत सरकार प्रयत्नशील असताना अश्‍ाा यात्रेमुळे झालेल्या गर्दीमुळे या महामारीत आणखी वाढ होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. तसेच जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सावंतवाडीत होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. ते बेकायदेशीर असून ते तात्काळ काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी शिवसैनिकांनी यावेळी केली.

अभिप्राय द्या..