NMMS परीक्षेत उभादांडा हायस्कुलची प्रतिक्षा प्रदिप नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम..

NMMS परीक्षेत उभादांडा हायस्कुलची प्रतिक्षा प्रदिप नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम..

वेंगुर्ला /-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत इयत्ता आठवीसाठी घेतल्या गेलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत न्यु इंग्लिश स्कुल उभादांडा विद्यालयाची कु.प्रतिक्षा प्रदिप नाईक हिने १८० पैकी १४५ गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तसेच या विद्यालयाच्या तब्बल ६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.प्रतिक्षा प्रदिप नाईक,आनंद किरण कारेकर,साक्षी दयानंद वेंगुर्लेकर,ऋचा विष्णू माणगांवकर,सर्वेश सचिन नवार,नम्रता हेमकांत कुर्ले यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.सदर विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर,विज्ञान शिक्षिका मनाली कुबल,सौ.अंधारी,सौ.भिसे व दिपक बोडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,त्यांच्या पालकांचे व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक उमेश वाळवेकर,संस्था चेअरमन विरेंद्र कामत आडारकर, संस्था सचिव रमेश नरसुले व कार्यकारिणी सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..