कणकवली शहरात केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे जंगी तयारी.;नगराध्यक्ष समीर नलावडे “भूतो ना भविष्य”असे करणार स्वागत..

कणकवली शहरात केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या स्वागतासाठी भाजपतर्फे जंगी तयारी.;नगराध्यक्ष समीर नलावडे “भूतो ना भविष्य”असे करणार स्वागत..

कणकवली /-

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे.ही यात्रा 25 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात दाखल होणार आहे.या यात्रेचे जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी भाजपतर्फे जंगी व शाही तयारी करण्यात आली आहे.कणकवली शहरात ही या यात्रेचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ‘भूतो ना भविष्य’ असे स्वागत करण्याचे ठरवले आहे.यात्रेच्या निमित्ताने शहरात ठिक ठिकाणी नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर झळकत असून हे बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. केंद्रीय मंत्री पदी राणेंची वर्णी लागल्या नंतर श्री.राणे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ते जिल्ह्यात दाखल होणार आहेत.यांच्या या दौऱ्याने स्थानिक नेते व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून राणेंच्या स्वागतासाठी कंबर कसली आहे.ही यात्रा अविस्मरणीय ठरण्याच्या दृष्टीने कार्यकर्ते जोरदार कामाला लागले आहेत.या यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी राणेंच्या स्वागताचे बॅनर लावून जिल्ह्यातील वातावरण भाजपमय करण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिप्राय द्या..