You are currently viewing वेंगुर्ले भाजपा च्या वतीने जिल्हा पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील प्रभाकर केळुसकर यांचा सत्कार..

वेंगुर्ले भाजपा च्या वतीने जिल्हा पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील प्रभाकर केळुसकर यांचा सत्कार..


वेंगुर्ला /-


महसूल दिनानिमीत्त जिल्हाधिकारी कार्यालय , सिंधुदुर्ग यांनी सन २०२० – २१ या वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करणारे वेंगुर्ले तालुक्यातील केळुस गावचे पोलिस पाटील प्रभाकर रघुनाथ केळुसकर यांना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यामुळे त्यांनी आपल्या गावाबरोबर वेंगुर्ले तालुक्याचे नाव रोशन केल्याबद्दल भाजपा च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण व जेष्ठ नेते विलास हडकर यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.१९८९ पासून पोलिस पाटील या पदावर काम करत असलेले प्रभाकर केळुसकर यांनी उत्तम कामगिरी बजावली.कोरोना महामारी काळातही उल्लेखनीय कार्याबद्दल भाजपा ने कोरोना योद्धा म्हणून पण या अगोदर सन्मानित केले होते.या सत्कार कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर , ता.का.का.सदस्य राजु पावसकर, युवा मोर्चा चे संदीप तांडेल,बुथप्रमुख पांडुरंग शिवलकर, नाना वराडकर, सुजित केळुसकर, बाळाजी प्रभु आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..