You are currently viewing कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड -मालवण- वेंगुर्ला अशी ‘टुरिस्ट टॉय ट्रेन ‘सुरू करा.;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र..

कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड -मालवण- वेंगुर्ला अशी ‘टुरिस्ट टॉय ट्रेन ‘सुरू करा.;केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र..

सिंधुदुर्गनगरी /-

कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड-मालवण- वेंगुर्ला अशी ‘टुरिस्ट टॉय ट्रेन ‘ सुरू करावी अशी मागणी केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना एका पत्राद्वारे केली आहे.

काही वर्षांपूर्वी राणे यांनी मालवण येथे एका कार्यक्रमात याबद्दल सूतोवाचही केले होते.त्यानंतर त्यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावित ‘टॉय ट्रेन ‘ प्रकल्पाचा प्राथमिक सर्व्हेही केला होता.मात्र त्यानंतर या विषयाला चालना मिळाली नव्हती. ही मूळ कल्पना स्वतः राणे यांचीच असल्याने केंद्रीय मंत्री होताच त्यांनी या विषयाला चालना मिळावी आणि यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. इथला निसर्गरम्य परिसर,मनाला भुरळ पाडणारे समुद्र किनारे, इथले ऐतिहासिक किल्ले, इथली कला -संस्कृती हे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे.या बाबी विचारात घेऊन ‘ टुरिस्ट टॉय ट्रेन ‘ लवकरात लवकर सुरू करावी अशी आग्रही मागणी राणे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

ही ट्रेन सुरू झाल्यास जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने येतील आणि जिल्ह्याची आर्थिक उन्नती होईल असेही राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सध्या अशी ट्रेन माथेरान उटी , दार्जिलिंग येथे सुरू असून ही ट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण बनली आहे.

अभिप्राय द्या..