You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुनिल भोगटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सुनिल भोगटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी कामाला लागा अमित सामंत राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक २१ रोजी जिल्हा दौऱ्यावर..

कुडाळ /-

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणूकांना आपण सामोरे गेले पाहीजे. तरुणपिढी राजकीय प्रवाहात अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यानी आज पक्षाच्या आढावा बैठकीत केले.

चिपळूणचे आमदार व पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक शेखर निकम हे २१ ला जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्याबाबत सर्व राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारणी सदस्य व सर्व सेलच्या जिल्हाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच तालुकाध्यक्ष व त्यांच्या कार्यकरणीची नियोजन आढावा बैठक तसेच माजी सभापती व जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार अशा कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, संघटक सचिव काका कुडाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी घोगळे, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर,जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर ,युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, व्यापार-उद्योग सेल जिल्हाध्यक्ष पुंडलीक दळवी, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दीपक जाधव, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नजीर शेख, उपाध्यक्ष बाबा खतिब, जिल्हा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, युवक महिला व्यापार-उद्योग अध्यक्षा दर्शना बाबर, पदवीधर शिक्षक जिल्हाध्यक्ष पांडुरंगा मेस्त्री,

जिल्हा उपाध्यक्ष रुपेश जाधव, देवेंद्र टेमकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. सामंत म्हणाले, “पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक शेखर निकम हे २१ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भोगटे यांचा वाढदिवस साजरा झाला.

भोगटे म्हणाले, की सामंत यांच्या नेतृत्वाखाली पक्ष यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे. राज्यात महाविकास आघाडी झाली आहे. तशी आघाडी जिल्ह्यातही झाली पाहिजे. निवडणुकांना सामोरे जायचे आहे. गांव तिथे राष्ट्रवादी ही मोहीम हाती घ्यावी असे सांगितले.

अभिप्राय द्या..