You are currently viewing नारायण राणेंना स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी येऊ देणार नाही.;खा.विनायक राऊत यांचा इशारा..

नारायण राणेंना स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी येऊ देणार नाही.;खा.विनायक राऊत यांचा इशारा..

सिंधुदुर्ग /-

येत्या १९ ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. यावेळी राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. मात्र त्याला शिवसेनेने विरोध केला आहे. स्मृती स्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.

नारायण यांसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. राणेंसारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेइमानी करणारा दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अशा या घरफोड्याला शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देऊ देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..