कणकवली /-

हळवल गावचे पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचे काम नेहमीच आदर्शवत राहिले आहे. पोलिस पाटील म्हणून कार्यरत असताना सर्वाना समान न्याय देण्याचे काम गुरव यांनी केले आहे. हळवल गावाला २०१० / २०११ साली तंटामुक्त गाव हा पुरस्कार मिळाला. त्यात पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचा मोलाचा वाटा होता. गावातील तंटे सलोख्याने सोडविण्याचे काम गुरव यांनी केले आहे. कोरोनाच्या काळातही जीवाची पर्वा न करता गुरव यांनी गावात सुयोग्य असे काम केले. त्याचे हे काम नेहमीच आदर्शवत राहील, असे गौरवोद्गार हळवल सरपंच दीपक गुरव यांनी काढले.

हळवल गावचे पोलीस पाटील प्रकाश गुरव हे सेवा निवृत्त झाले त्याबद्धल हळवल गावच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच अरुण राऊळ, ग्रा. प. सदस्य सुजाता परब, प्रकाश घोगळे, उत्तम जाधव, ग्रामसेवक सुरेश केदार, माजी सभापती मधुकर सावंत, जयसिंग राणे, गणेश राणे, मारुती सावंत, भास्कर राणे, बबन सावंत, धाकू तांबे आदींसह हळवल ग्रामस्थ उपस्थित होते.

आपण केलेल्या सामाजिक कार्यात हळवल वासीयांचे खूप मोठे सहकार्य लाभले. आपला गाव नेहमीच तंटामुक्त राहावा, यासाठी आपण प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झालो. मी आज माझ्या पोलीस पाटील या पदावरून निवृत्त झालो असलो तरी हळवल गावासाठी नेहमी आपण कार्यरत राहू, असे प्रतिपादन निवृत्त पोलीस पाटील प्रकाश गुरव यांनी यावेळी बोलताना केले. हळवल पोलिस पाटील प्रकाश गुरव हे निवृत्त झाल्यानंतर सदर पद हे रिक्त झाले सध्यस्थितीत हळवल गावासाठी कासरल गावचे पोलीस पाटील उदय सावंत यांच्या जवळ अतिरिक्त पदभार असून हळवल गावात लवकरात लवकर नवीन पोलीस पाटील नियुक्त करावेत, अशी मागणी हळवल ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page