भुईबावडा घाटमार्गे होत असणारी पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक बंद..

भुईबावडा घाटमार्गे होत असणारी पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक बंद..

गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांची माहिती..

वैभववाडी /-

भुईबावडा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही पश्चिम महाराष्ट्रातून भुईबावडा घाटमार्गे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु आहे. याबाबत गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून भुईबावडा घाटमार्गे होणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आल्याची माहिती दूरध्वनीवरून दिली आहे.

भुईबावडा घाटरस्त्यात रिंगेवाडीपासून चार ते पाच कि. मी. अंतरावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठ्या भेगा पडून रस्ता खचत चालला आहे. सार्व. बांध. विभागाने या भेगा माती टाकून बुजविल्या आहेत. पर्यायी मार्ग म्हणून गटार बुजवून लहान वाहतूकीसाठी रस्ता खुला करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने भुईबावडा घाट अवजड वाहतूकीसाठी बंद केला होता. परंतु अनेक चालकांनी शासनाचे आदेश धुडकावून लावत या मार्गावरून अवजड वाहतूक सुरु ठेवली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातून भुईबावडा घाटमार्गे वाहतूक सुरु असल्याने खबरदारी म्हणून भुईबावडा घाटमार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात येत असल्याची माहिती गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..