जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी जाणून घ्या…

जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी जाणून घ्या…

सिंधुदुर्ग /-

आज सकाळी ८.०० वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३८.६०० मी. आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मी. व धोका पातळी ४३.६०० मी. इतकी आहे. कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ ४.५०० मी. आहे. तर या नदीची इशारा पातळी ९.९१० मी. आणि धोका पातळी १०.९१० मी. आहे. वाघोटन नदीची पातळी खारेपाटण पुलाजवळ २.९०० मी. इतकी असून इशारापातळी ८.५०० मी. व धोका पातळी १०.५०० मी. आहे, अशी माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..