You are currently viewing ‘आम्ही बालकवी’ आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धांचा निकाल जाहिर..

‘आम्ही बालकवी’ आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धांचा निकाल जाहिर..

सावंतवाडी /-

‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या समूह सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित ‘श्रावण’ विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. श्रावण विषयावर घेतलेल्या या राज्यस्तरीय निबंध व काव्यलेखन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : खुला गट निबंध स्पर्धा (मोठा गट) – सर्वोत्कृष्ट- सुनील मुळीक, उत्कृष्ट- दीपक पटेकर, प्रथम-ईश्वर थडके व रजिया शिदलाळे, द्वितीय- आदिती मसुरकर व संदीप सावंत, तृतीय- अनुराधा उपासे, संध्या ठाकूर, उत्तेजनार्थ- कल्पना नागमोती, सायली कोयंडे, राधिका कांबळी.
खुला गट निबंध स्पर्धा (लहान गट)- सर्वोत्कृष्ट वैष्णवी बोंद्रे, उत्कृष्ट- प्राजक्ता आपटे, प्रथम- नीला सोनवणे, द्वितीय- देवयानी आजगावकर, तृतीय- अक्षय सितापुरे.
प्राथमिक व माध्यमिक गट काव्यलेखन स्पर्धा- सर्वोत्कृष्ट-निनाद राऊळ, उत्कृष्ट- मधुरा गोंदाणे, प्रथम- दिया बोर्डेकर, युगंधरा खानोलकर, द्वितीय- सानिया शिदलाळे, वेदिका धाऊसकर, तृतीय- अदीती सावंत, सिध्दी बोंद्रे, उत्तेजनार्थ- रिया सावंत.
प्राथमिक व माध्यमिक गट निबंध लेखन स्पर्धा- प्रथम- स्नेहल परब, द्वितीय- साईश देऊलकर यांनी यश मिळविले.
या स्पर्धांचे परीक्षण वेंगुर्ला येथील उभादांडा शाळेचे शिक्षक रामा पोळजी यांनी केले. मार्गदर्शन मृण्मयी घमंडी यांचे लाभले. या यशाबद्दल समूह प्रशासक राजेंद्र गोसावी, मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अभिप्राय द्या..